या
होमगार्ड भरतीमध्ये एकूण 82 उमेदवार भरती
केले जातील. त्यामध्ये शहरी 22 व ग्रामीण 60
जागांचा समावेश राहील. भरती झाल्यावर उमेदवारास कसल्याही प्रकारचा
पगार मिळणार नसून शासनाच्या नियमानुसार भत्ता दिला जाईल,
असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
यासाठी
पुरुष उमेदवाराचे वय 20 ते 35
वर्ष दरम्यान असावे, तो
दहावी उत्तीर्ण असावा. भरतीस येताना उमेदवाराने शाळा सोडल्याचा मूळ दाखला तसेच
वीजेचे बील, रेशनकार्ड, मतदान
कार्ड, टेलीफोन बील, आधारकार्ड
यापैकी एक पुरावा सोबत आणावा. स्वत:ची दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आणावीत,
स्थानिक एन. सी. सी. व उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारास
प्राधान्य देण्यात येईल. सर्व प्रमापत्राच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह भरतीस
उपस्थित रहावे. भरतीसाठी कसल्याही प्रकारची शिफारस अथवा दबाव आणल्यास किंवा अवैध
मार्गाचा अवलंब केल्यास उमेदवाराची नियुक्ती रद्द केली जाईल,
असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...