बंगळुर
- आंध्र प्रदेशतील अनंतपूरम जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे बंगलोर-नांदेड
एक्स्प्रेसच्या वातानुकुलित बोगीला लागलेल्या भीषण आगीत 23 जणांचा होरपळून
मृत्यू झाला. तर, आठ प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी धर्मावरम
येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बंगळुरहून
नांदेडला जात असलेल्या एक्स्प्रेसच्या सेकंड एसीच्या बोगीला आज पहाटे
तीनच्या सुमारास अनंतपुरम जिल्ह्यातील पुट्टपर्थीजवळ आग लागली. यावेळी या
बोगीतून 72 प्रवासी प्रवास करत होते. बोगीचे दरवाजे आणि काचा बंद
असल्यामुळे आतमध्येच आगीचे लोट पसरले आणि काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू
झाला. चालकाला आगीबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वे थांबविण्यात आली आणि
आतमधील प्रवाशांना काचा तोडून बाहेर काढण्यात आले. काही प्रवाशांनी
रेल्वेतून उड्या मारल्याचेही वृत्त आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची
शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
बंगळुरहून
नांदेडकडे जाण्यासाठी ही रेल्वे शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता निघाली
होती. आज पहाटे तीनच्या सुमारास या बोगीला आग लागल्याची शक्यता
वर्तविण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेले हेल्पलाईन
नंबर-08022354108, 08022259271, 08022156554, 0822156553
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...