शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

नांदेड- बँगलोर एक्स्प्रेसमधील नांदेडचे ७ प्रवासी बेपत्ता.


बंगलोर-नांदेड एक्स्प्रेसच्या बी-१ या वातानुकुलीत डब्ब्याला शनिवारी पहाटे आग लागून त्यात २७ प्रवाश्यांचा दुर्दैवी अंत झाला. या कोच मधील नांदेडला येणाऱ्या ७ प्रवास्यांचा रात्री ८ वाजेपर्यंत कोणताही शोध लागू शकला नाही. नांदेड जिल्हा प्रशासन त्यांच्या शोधासाठी सर्व यंत्रणेच्या संपर्कात आहे. असं रात्री उशिरा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जिल्हा प्रसासनान कळविले आहे.

बेपत्ता झालेल्या प्रवाशांची नावे श्रीमती प्रेमलता राठी (वय ६१), चांदपाल राठी (वय ७२), तनुजा राठी (वय २६), श्रीमती दलविंदर कौर (वय 25),अनिरुद्ध कुलकर्णी (वय २४), एम.बी.पाटील (वय ७३), मंजुनाथ पाटील (वय ३६) या सर्व प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विशेष मदत व सहायता केंद्र स्थापित करण्यात आले असून त्यांनी कुठल्याही प्रकारची सहायता, मदत अथवा बेंगळूरू येथे खालील क्रमांकावर संपर्क करावा अशी विंनती जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष (०२४६२) २३५०७७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...