दि.१९ - नांदेड (प्रतिनिधी)-
आनंदनगर चौकातील इंण्डेन रेणुकादेवी गॅस वितरकाचे दुकान गुरुवारी अचानक बंद राहिल्याने ग्राहकांना बंद दुकानाचे दर्शन घेऊन परत जावे लागलेे.
आधार कार्डाची सक्ती व अन्य जाचक नियमामुळे सध्या सर्वच गॅस ग्राहक कमालीचे वैतागले आहेत.
आनंदनगर भागात इंण्डेन रेणुकादेवी गॅस वितरक दुकान आहे.
हे दुकान आनंदनगर कोपर्यावर मध्यवस्तीत असून आधार कार्ड व अन्य कामा निमित्ताने सर्वसामान्य ग्राहक सकाळी १० वाजता त्या दुकानावर पोहचले परंतु दुकानाचे शटर बंद होते. अपरिहार्य कारणास्तव आज दुकान बंद राहील अशी चिठ्ठी शटरवर चिटकवली होती.
ती चिठ्ठी वाचून आणि शटरला मोठे कुलूप पाहून शेकडो लोक आल्या वाटेने परत गेले.
तेथे कोणीही जबाबदार माणूस नव्हता. या बाबत कोणता प्रश्न विचारावा आणि कोणाला असा सवाल ग्राहकाला पडला होता. कांही जणांनी ९८६००८४११६४ या क्रमांकावर भ्रमणध्वनी लावला. मला माहित नाही, मी बाहेरगावी आहे असे उत्तर नरवाडे नावाच्या कर्मचार्याने दिले आणि स्वतःची
सुटका करून घेतली. परंतु अन्यत्र मिळालेल्या माहितीनुसार रेणुकादेवी गॅस वितरक कंपनीतील एका कर्मचार्याचे नातेवाईक यांचे अचानक निधन झाले त्यामुळे त्यांना अंत्यसंस्कारासाठी जावे लागले त्यामुळे स्वतःच्या अखत्यारित चिठ्ठी चिटकवून ते कर्मचारी शटरला कुलूप लावून निघून गेले.
परंतु असे कर्मचार्याला करता येते का? पर्यायी सोय का केली नाही या प्रश्नाचे उत्तर जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी संबंधित एजंसीला विचारले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाला या बाबत फोनवरून चौकशी केली असता कोणीही फोन उचलला नाही.
या बाबत संबंधित एजंसीला जिल्हाधिकारी जाब विचारतील का असा प्रश्न उत्पन्न होत आहे ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...