रविवार, २२ डिसेंबर, २०१३

शेतकऱ्यांसाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे महाअधिवेशन.


दि.२२,नांदेड
(मराठी स्वराज्य वार्ताहर)
आधुनिक शेती करून अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मराठा सेवासंघच्या वतीने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे रविवारी (दि.२२) एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशांचे आयोजन करण्यात आले.
डॉ.शंकरराव चावण प्रेक्षागृहात रविवारी सकाळी १० वाजता प्रारंभ होणाऱ्या या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उदघाटन कृषी व पणनमंत्री राधाकृष विखे पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,नेताजी गोरे,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,पालकमंत्री डी.पी.सावंत,खासदार भास्करराव पाटील,हिंगोलीचे खासदार सुभाष वानखेडे उपस्थित होते.या परिषदेचे जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर हे संयोजक होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...