मुंबई : ‘आदर्श’ चौकशी
आयोगाच्या अहवालाने प्रश्न उपस्थित झाले असतील, तर पक्ष व नोकरशहांच्या
दबावाला बळी न पडता त्याची चौकशी झाली पाहिजे व ते प्रकरण दाबून न टाकता
त्याची उत्तरे द्यायला हवीत, अशा आशयाचे ट्विट केंद्रीय मंत्री मिलिंद
देवरा यांनी केल्याने काँग्रेसच्या गोटात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यावर म्हणाले, की हा अहवाल फेटाळावा असे काँग्रेसला वाटत होते तेव्हा तो फेटाळला. त्यांना पुन्हा याची चौकशी हवी असेल तर आमचे काहीच म्हणणे नाही. मात्र काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी व पक्षाच्या इतरही नेत्यांनी याबाबत मौन पाळणेच पसंत केले. देवरा गटाच्या काही आमदारांनी मात्र हे ट्विट जाहीर झाल्यावर याबाबत सारवासारव करण्यास सुरुवात केली. देवरा यांच्या या ट्विटनंतर अशोक चव्हाण यांच्या सर्मथक आमदारांनी याबाबत देवरा यांच्या निकटच्या आमदारांकडे विचारणाही सुरू केली. यामुळे याचे राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने देवरा यांना केवळ या प्रकरणात लपविण्यासारखे काहीही नसल्याने यात आम्ही कुठल्याही प्रश्नांना उत्तरे देण्यास सर्मथ आहोत व चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत, असे म्हणायचे होते, अशी सारवासारव सुरू झाली. यापूर्वी दोषी खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात येणार्या वटहुकुमावरही देवरा यांनी असेच ट्विट केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तो वटहुकूम फाडून फेकून देण्याच्या लायकीचा असल्याचे दिल्ली प्रेस क्लबमध्ये जाहीर वक्तव्य केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...