नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर येथील सिमंत मंगल कार्यालयात आम आदमी पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रविवारी सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुभाष वारे, मयंक गांधी, अंजली दमानिया, विजय पांढरे, मारोती भापकर, वसंत डोके, राजीव भिसे हे प्रमुख नेते उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील १८० प्रतिनिधींच्या उपस्थितीत पक्ष संघटना वाढीच्या मुद्यावर चर्चा झाली. उमेदवार निवड प्रक्रिया, हिशोबातील पारदर्शकता, तालुका व विधानसभा क्षेत्र कार्यकारिण्या, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण, महाराष्ट्रात पक्षवाढीला अनुकूलता विषयांवर कार्यकारिणीत चर्चा झाली.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निवडीसाठी नागरिकांची मते जरूर आजमामावित मात्र अंतिम निर्णय राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीनेच घ्यावा, असे आग्रही मत विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मांडले. उमेदवारी मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर इच्छुकांकडून लोकमत निर्माण केले जाऊ शकते, याकडे लक्ष वेधण्यात आले. या बैठकीच्या निमित्ताने शहरातील नागरिकांना उत्सुकता होती. इतर पक्षातील स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल भेटी गाठी घडवून आणण्यात आल्या.
दिल्लीपेक्षा महाराष्ट्र वेगळे
नवी दिल्लीमधील प्रश्न, महानगरीय परिस्थिती यामुळे तेथे मेहनत घेतल्यानंतर घवघवीत यश मिळाले. भ्रष्टाचाराला विरोध व गुड गव्हर्न्सन्स हे मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी ग्रामीण भागाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असे प्रतिनिधींनी ठासून सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या, असंघटीत क्षेत्रातील लोक, स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांच्या आधारेच पक्ष वाढवावा लागेल, असा सूर प्रतिनिधींच्या चर्चेत निघाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...