श्रीक्षेत्र माहूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पंडित डॉ.विद्यासागर यांच्या हस्ते श्री रेणुकादेवी महाविद्यालयात उभारण्यात येणार्या इनडोअर स्टेडियमच्या नियोजित वास्तुचे भूमिपूजन झाले.
श्रीक्षेत्र
माहूर शहरातील श्री रेणुकादेवी महाविद्यालय हे नावाजलेले महाविद्यालय
असल्याने येथे शासनाकडून इनडोअर स्टेडियमसाठी ७0 लाख रुपये मंजूर करण्यात
आले आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन
कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू म्हणाले, विद्यार्थ्यांनी कसं
शिकायचं यासाठी शिक्षण घेवून मी जिंकणारच या भूमिकेने खेळत रहावे व
स्वत:मधील क्षमता वेळोवेळी तपासत रहावी, असा संदेश देवून रेणुकादेवी
महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरतात, ही
भूषणावह बाब आहे. इनडोअर स्टेडियम लवकरात लवकर पूर्ण करुन याचा लाभ
खेळाडूंना व्हावा,
अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ऐश्वर्या बोरकर व सोनाली कुंदन रूनवाल या खेळाडू विद्यार्थिनींचा कुलगुरूंच्या
ऐश्वर्या बोरकर व सोनाली कुंदन रूनवाल या खेळाडू विद्यार्थिनींचा कुलगुरूंच्या
हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...