शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

एस जी जी एस अभियांत्रिकी येथे “बेस्ट पॉलीसीज ऍन्ड प्रॅक्टीसेस” राष्ट्रीय स्तरावरील परिषद संपन्न.


नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या संस्थेत टेक्युप - 2 अंतर्गत बेस्ट पॉलीसीज ऍन्ड प्रॅक्टीसेस या विषयावरील दोन दिवस चालणा-या राष्ट्रीय स्तरावरील परिषदचे उद्धाटन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. डी.पी.सावंत यांचे शुभहस्ते दिनांक 10 जानेवारी 2014 रोजी संपन्न झाले.

सदरील परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी मा. ना. श्री डी.पी.सावंत, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेसह श्री अभय वाघ, उपसचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई, पद्मश्री डॉ. किरण सेठ, आय. आय. टी. दिल्ली, प्रा. डॉ. बी. एस. सोंडे, माजी कुलगुरू गोवा विद्यापीठ, प्रा.सी.पी.त्रिपाठी, माजी उपाध्यक्ष बजाज ऍटो, औरंगाबाद, श्री प्रशांत देशपांडे, औरंगाबाद, डॉ. दिपक वाईकर,सिंगापुर, श्री रविंद्र पुरोहित, उपाध्यक्ष लवासा, श्री शेखर पाटील, मुंबई, डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे संचालक अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, मा. श्री चंद्रकांत गव्हाणे, उद्योगपती तथा सदस्य संचालक मंडळ, एस जी जी एस अभि. व तंत्रसंस्था, नांदेड, संस्थेचे संचालक डॉ. एल.एम.वाघमारे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.

या प्रसंगी माजी प्राचार्य प्रा.बि.एम.नाईक, डॉ.टी.आर.सोनटक्के - संचालक मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, डॉ. संगीता वैद्य, मुंबई यांचेसह तंत्रशिक्षण क्षेत्रातील अनेक नामवंत यांचेसह या परिषदेस भारतभरातून जवळपास 150 हून अधिक प्रतिनीधीचा सहभागी झालेले आहेत.र्यक्रमाच्या सुरवातीस संस्थेचे संचालक डॉ. एल. एम. वाघमारे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. तसेच परीषदेच्या आयोजनामागील भूमीका स्पष्ट केली. व परिषदेची थिम लर्न, थिंक व इंनोव्हेट बध्दल माहिती सांगीतली.

या प्रसंगी बोलतांना तंत्रशिक्षण विभागाचे उप सचिव श्री अभय वाघ यांनी तंत्रशिक्षणाच्या प्रगतीचे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचे दशकनिहाय टप्पे सांगतानाच सध्या महाराष्ट्र शासनच नव्हे तर केंद्र सरकार सुध्दा तंत्रशिक्षणाच्या विकासासाठी व तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करीत आहे हे सांगीतले. त्याच बरोबर TEQIP (तंत्रशिक्षण गुणवत्ता सुधार योजना) मार्फत मिळत असलेल्या अर्थसहायामुळे तंत्रशिक्षणाची गुण्पवत्ता वाढविण्यासाठी कशी मदत होत आहे हे सांगीतले. या शिवाय देशाच्या प्रगतीसाठी उद्योगाची प्रगती व उद्योगाच्या प्रगतीसाठी नवनविन शोध व प्रगततंत्रज्ञानाची आवश्यकता व त्या साठीची शासनाचे प्रयत्न याची माहिती दिली.
या प्रसंगी बोलतांना उच व तंत्रशिक्षण राज्यमंत्री मा. ना. डी. पी. सावंत म्हणाले की कालच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दोन म्हत्वाचे निर्णय झाले त्यातील एक म्हणजे तंत्रविद्यापीठाची स्थापणा व तंत्रशिक्षण संस्थेचे त्यांना संलग्नीकरण व दुसरे म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन ऍन्ड ट्रेनिंग ऍक्ट.

तसेच TEQIP (तंत्रशिक्षण गुणवत्ता सुधार योजना) मार्फत मिळालेल्या पहिल्या टप्यातील निधीमुळे पदवी अभ्यासक्रमास पुरक बाबी व दुस-या टप्यात मिळालेल्या अनुदानातुन पदव्युत्तर शिक्षण, पी.एच.डी. व संशोधनासाठी आवश्यक अर्थसहायातून गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत होत असल्याचे सांगीतले. याचा फायदा घेवून जागतील स्थरावर स्पर्धा करू शकतील असे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळवून दयावे असे सांगीतले.
हे सांगतानाचा या संस्थेने केलेल्या प्रगतीच्या जोरावर या संस्थेस रूसा (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) अंतर्गत कांही काळात या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळेल असे सांगीतले.

या प्रसंगी बोलतांना पद्मश्री डॉ. किरण शेठ यांनी मानवाच्या सर्वांगीन विकासासाठी, बुध्दीमत्ता विकासासाठी व कार्यकुशलता विकासासाठी जिवनात असलेले संगीताचे महत्व, योगसाधनेचे व ध्यानधारनेचे महत्व सांगुन त्यांच्या जिवनात झालेल्या उपयोगाची उदाहरणे पण सांगीतली. तसेच जिवनातील गुरूचे स्थान व महत्व याची माहिती सांगीतली. वरील बाबीसाठी अभ्यासक्रमात स्थान देवून प्रत्येक संस्थेत या बाबीसाठी स्वतंत्र सेलची व्यवस्था करण्याचीही त्यांनी विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. अनुपकुमार चक्रवर्ती यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एम. एल. वाईकर यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ. एल. एम. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिषदेचे समन्वयक डॉ. एम. एल. वाईकर, डॉ. अनुपकुमार चक्रवर्ती, डॉ.एस.एस.गाजरे, अधिष्ठाता प्रा. एस.टी.हमदे, प्रा.एस.बी.शर्मा तसेच प्रा. बि.एम.पत्रे, प्रा. पी.जी.जाधव, प्रा. ए.बी. गोंडे, परिषदेसाठी स्थापण केलेल्या विविध समित्या वरील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी याच बरोबर संस्थेतील इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी परीश्रम घेत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...