औरंगाबाद शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विलासराव देशमुख व अशोक चव्हाण हे तिघे माजी मुख्यमंत्री आदर्श घोटाळ्याशी संबंधित व तिघेही मराठवाड्याचे हा एक योगायोग. त्यामुळे येत्या निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसची स्थिती अडचणीची होऊ शकते.
पूर्ण
बातमी वाचण्यासाठी
लिंकवर क्लिक
करा.
आदर्शचा अहवाल सादर करण्यास राज्य सरकार आतापर्यंत टाळाटाळ करत होते. देशभरात आदर्श घोटाळ्यामुळे राजकीय भूकंप झाला होता. राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नुकतेच अभय दिले असले, तरी चौकशी आयोगाने मात्र त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. नातेवाइकांना फ्लॅट देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हे अहवालात नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीला डाग लागला आहे.
आदर्श घोटाळा समोर आला, तेव्हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते. पुढे राजकीय अडचण होत आहे, हे लक्षात घेताच दोघांमध्ये दिलजमाई झाली होती. त्यासाठी विलासराव खास नांदेडमध्ये चव्हाणांच्या भेटीला गेले होते.
वैद्यकीय गुणवाढीप्रकरणात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आदर्श प्रकरणातही त्यांचे नाव गोवले गेल्याने प्रतिमा डागाळली गेली आहे. या अहवालामुळे मराठवाड्यात काँग्रेसची प्रतिमा आणखी डागाळली जाणार आहे. पूर्वी मराठवाडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण गेल्या दोन दशकांत शिवसेना-भाजप युतीने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. या माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळल्याने आगामी निवडणुकीत सेना भाजप युतीला फायदा होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...