सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

जयाजीराव सूर्यवंशी यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

                     औरंगाबाद  : जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे निमंत्रक जयाजीराव सूर्यवंशी यांनी रविवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. बीड बायपास रोडवरील सिद्धीविनायक लॉनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयंक गांधी व अंजली दमानिया यांची प्रमुख उपस्थिती होती. सूर्यवंशी यांच्या संघर्षशील वृत्तीबद्दल या दोघांनीही कौतूक करून लढाऊ कार्यकर्त्यांमुळे आम आदमी पक्षाला बळ मिळेल, असे सांगितले. या कार्यक्रमाला जयाजीराव सूर्यवंशी यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...