भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर तसेच काँग्रेसने पाठिंबा देऊ केल्यानंतर 'आप'समोर सत्ता स्थापनेसाठी दबाव वाढला होता. मात्र, सरकार चालवणे जमेल की नाही अशा गोंधळात अडकलेल्या केजरीवाल यांनी पुन्हा जनतेच्या दरबारात जाऊन मते मागवली. त्यांच्या आवाहननानंतर 'आप'ला एकूण ५ लाख २३ हजार दिल्लीकरांनी एसएमएस पाठवले. त्यातील ८० टक्के एसएमएस सरकार स्थापनेच्या बाजूने आल्याने 'आप'ला निर्णय घेणे भाग पडले. सोमवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या बैठकीत सरकार स्थापण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. खुद्द केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांनी मुख्यमंत्रीपदासाठी केजरीवाल यांच्या नावाची घोषणा केली. ४५ वर्षीय केजरीवाल हे दिल्लीचे सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री असतील. केजरीवाल दुपारी साडेबाराच्या सुमारास नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेणार असून सरकार स्थापनेचा औपचारीक दावा करणार आहेत. 'शपथविधीचे ठिकाण राज्यपालांशी चर्चा केल्यानंतरच निश्चित करण्यात येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...