माळेगाव येथे खंडोबाची यात्रा.
नांदेड 24, माळेगाव यात्रेच्या तयारीसाठी आज दिनांक
25 डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र माळेगाव येथे पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या
उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे.
दरवर्षी माळेगाव
येथे खंडोबाची यात्रा भरविण्यात येते. यानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या
विविध योजनांचे प्रदर्शनही या यात्रेत भरविण्यात येते. माळेगावच्या
आयोजनसंदर्भात आज 25 डिसेंबर रोजी दूपारी तीन वाजत माळेगाव गाव येथील विश्रामगृह
येथे ही बैठक होणार आहे. या बैठकित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील
बेटमोगरेकर, आ. शंकरअण्णा धोंडगे, आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. हनमंतराव पाटील
बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, शिक्षण सभापती संजय पाटील
क-हाळे, आरोग्य व अर्थ सभापती प्रविण पाटील चिखलीकर, समाजकल्याण सभापती मंगाराणी
अंबुलगेकर, महिला व बालकल्याण सभापती कौशल्याबाई तमशेट्टे, जिल्हाधिकारी
धीरजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, कंधार व लोहा
परिसरातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, माळेगावच्या सरपंच, मंदीर समिती
व यात्रा समितीचे सदस्य, जिल्हा पोलीस अधिकक्षक, विद्युत विभागाचे अभिंयता,
आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी, यांच्यासळ जिल्हयातील संबंधीत विभागाचे खाते प्रमुख,
अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती जिल्हा
परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव
यू.ए. कोमवाड यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...