मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

'व्होट फॉर इंडिया' मोदींचा नवा नारा

हिंदुत्व नव्हे ... विकास

सन २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी नाही तर देशासाठी मत मागितले जाईल. त्यासाठी ' व्होट फॉर इंडिया ' हा आमचा नारा असेल. भ्रष्टाचाराविरोधात ' व्होट फॉर इंडिया '... महागाई हटवण्यासाठी ' व्होट फॉर इंडिया '...' असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत केले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित ' महागर्जना रॅली ' च्या निमित्ताने भाजपने स्वतःच्या बळावर सुमारे अडीच लाखांची गर्दी जमवून विराट शक्तिप्रदर्शन केले. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांची पार्श्वभूमी या रॅलीस होती. मोदी यांचे या रॅलीसाठी हेलिकॉप्टरने आगमन झाले, तेव्हा सभेत उत्साह संचारला. सभा मुंबईत होत असल्याचे राजकीय भान बाळगत मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ' महाराष्ट्राला माझा नमस्कार. काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आघाडीवर राहील. मुंबईत इतकी विराट सभा मी याआधी पाहिलेली नाही ', असे उद्गार मोदी यांनी यावेळी काढले. महागाई, बेरोजगारी, जातीयवाद हे नष्ट करण्यासाठी, तसेच सुराज्य, सुशासन यासाठी व्होट फॉर इंडिया, असा नारा त्यांनी दिला. ज्या मुंबईतून ब्रिटिशांना ' चले जाव ' चा नारा ऐकविण्यात आला होता, त्याच मुंबईतून आता काँग्रेसला चले जाव असा नारा आम्ही देत आहोत, अशी गर्जनाही त्यांनी केली.
मोदी म्हणाले ...

महाराष्ट्र मोठा, तर गुजरात छोटा भाऊ.

राज्यांच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात २६ मुख्यमंत्री, तर गुजरातमध्ये १४ मुख्यमंत्री.

काँगेसच्या भाषावार प्रांतरचनेच्या धोरणामुळे राज्याराज्यांमध्ये भांडणे.

गुजरातच्या विकासाबद्दल मी बोललो की अनेकांच्या पोटात दुखते.

महाराष्ट्रातील दुष्काळाला राज्यातील राजकारणी जबाबदार.

आदर्श अहवाल दडपला असताना राहुल गांधी भ्रष्टाचाराविरोधात उपदेश देतात.

केंद्र सरकारने अल्पसंख्याकांसाठी केलेली आर्थिक तरतूद कुठे गेली?

जेथे गावांमध्ये अंधार आहे तो महाराष्ट्र, गुजरातमध्ये २४ तास वीज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...