शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

फाईल ट्रान्स्फर करताना वेळ लागतोय, एरर येतोय ?


http://weeklymarathiswarajya.blogspot.com/

अनलॉकर:
कॉम्प्युटरवरील एखादी फाईल डिलीट होत नसेल, तर त्याची विविध कारण असू शकतात. सर्वसाधारणपणे पुढील कारण आपल्यासमोर येतात:

Cannot delete file:Access is denied.
There has been a sharing violation.
The source or destination file may be in use.
The file is in use by another program or user.
Make sure the disk is not full of write-protected and that the file is not currently in use.

यातील कुठल्याही एका करणामुळ संबंधित फाईल किंवा फोल्डर डिलीट करता येत नाही.
थोडक्यात, विन्डोज तर्फे ते लॉक केले जाते. सर्वसाधारण कॉम्प्युटर वापरणाऱ्या व्यक्तीस या कारणांच्या मुळाशी जाऊन विश्लेषण करण्याची गरज भासत नाही.त्या क्षणी संबंधित फाईल डिलीट करणे मात्र आवश्यक असते. उदा. आपण इंटरनेट कॅफेतल्या किंवा ऑफिसमधल्या कॉम्प्युटरवर एखादी वैयक्तिक फाईल डाउनलोड केलेली असेल आणि जाताना ती डिलीट करून जायचं असेल. पण, ती डिलीट करता येत नाही, असा मेसेज आला तर ? अशा वेळी अनलॉकसारखे अप्लीकेशन कामास येते. अनलॉकर डाउनलोड करून इंस्टाल करा.
जी फाईल किंवा फोल्डर डिलीट करायचे आधी त्यावर राइट क्लिक करून अनलॉकरचा पर्याय निवडा.
विंडोजने लॉक केलेल्या फाईल्सची यादी तुमच्या समोर येईल.
त्यातील संबंधित फाईलवर क्लिक करून ती अन लॉक करा.
आता ती फाईल थेट डिलीट होईल.
फाईल रिसायकल बिनमध्ये न जाता कायमची डिलीट होण्यासाठी शिफ्ट + डिलीट करा.
अनलॉक :
http://www.emptyloop.com/unlocker/
या लिंक वरून डाउनलोड करता येईल.

1 टिप्पणी:

Please comment here...