नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी ते पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांचा भाषा आणि अध्ययन अनुशेष भरून काढण्यासाठी नायगाव तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११० शाळांमध्ये हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद आणि प्रथम एज्यूकेशन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत मुलांसाठी वाचन,लेखन आणि गणित या विषयांसह मुलांना ऐकाणे, बोलणे, संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया अवगत करणे अपेक्षित आहे. अध्ययनातील अनुशेष दूर करण्याचा हा कार्यक्रम सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...