मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार-सभापती
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासोबतच बीएसयुपी घरकुलांच्या कामांना गती
देण्यावर आपला विशेष भर राहील, अशी माहिती नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती
उमेश पवळे यांनी दिली. स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड
झाल्यानंतर पवळे यांनी महापौर अब्दुल सत्तार, आ. ओमप्रकाश पोकर्णा यांच्या
उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. शीला कदम, सभागृह नेते
विरेंद्रसिंघ गाडीवाले, उपस्थित होते.
पत्रपरिषदेत बोलताना सभापती पवळे म्हणाले, शहरातील स्वच्छतेच्यासंदर्भात
सुधारणा करण्यासाठी कृती कार्यक्रम आखणे तसेच महापालिकेच्या
उत्त्पन्नवाढीशी निगडित असलेल्या एलबीटी, गुंठेवारी, मालमत्ता कर या
घटकांवर लक्ष केंद्रित करून कर्मचार्यांचे वेतन नियमित करण्यासाठी
प्रयत्नशील राहील. आपल्यासमोर महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली करण्याचे आव्हान असले तरी शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यासाठी
गरजेनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...