गुरुवार, २ जानेवारी, २०१४
देशी डिजिटल चलन ‘लक्ष्मीकॉइन’?
बिटकॉइन किंवा त्यासारख्या डिजिटल कॉइन म्हणजेच कम्प्युटरनिर्मित व्हर्च्युअल करन्सीच्या नियमनाबाबत सध्या जगभर गंभीर चर्चा सुरू असली तरी, या चलनांचा वापर प्रचंड वाढला आहे.
देशी ई-करन्सी काढण्याचाही प्रयत्न केला जात असून त्याला ' लक्ष्मीकॉइन ' असे म्हटले जाईल. मात्र, रिझर्व्ह बँकेने ई-करन्सीबाबत सावध राहण्याचा इशारा दिल्यामुळे ' लक्ष्मीकॉइन ' अस्तित्वात येण्याबाबत शंका निर्माण झाली आहे!
जगभरात ६७ ई-करन्सी किंवा डिजिटल करन्सीचा वापर केला जात असून त्यांचे मूल्य तब्बल १३ अब्ज (८० हजार कोटी) डॉलर इतके आहे. रिपल, लाइटकॉइन, मास्टरकॉइन, एनएक्सटी, डॉजकॉइन अशी काही डिजिटल चलने अस्तित्वात आहेत. बिटकॉइन या डिजिटल चलनाचे मूल्य ९ अब्ज डॉलर इतके आहे. भारतात बिटकॉइनचा व्यापार काही कोटी रुपयांमध्येच असला तरी, अनिवासी भारतीयांकडून बिटकॉइनचा वापर अधिक होण्याची शक्यता आहे. मनी लाँडरिंगची शक्यता आणि सायबर सुरक्षेला असणारा धोका याबाबत रिझर्व्ह बँकेच्या इशाऱ्यानंतर देशातील बिटकॉइनसाठीचे एक्स्चेंज प्लॅटफॉर्म अनेक एजंटांनी बंद केले आहेत.
रुपये, डॉलर यासारख्या परंपरागत चलनाच्या बदल्यात बिटकॉइनसारखी व्हर्च्युअल करन्सी मिळू शकते. त्यासाठी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म आहेत. परंपरागत चलन देईन ई-करन्सी वैयक्तिक खात्यात जमा केली जाते, त्याला ' डिजिटल वॉलेट ' म्हणतात. या वॉलेटचा वापर करून ही व्हर्च्युअल करन्सी ती स्वीकारणाऱ्या कुणालाही ऑनलाइन पाठवता येते. ही करन्सी देऊन पुन्हा परंपरागत चलनही मिळवता येते. त्यामुळे डिजिटल करन्सीचा वापर वस्तू आणि सेवा खरेदीसाठी करता येणे शक्य आहे. दुकान, हॉटेल, सिनेमागृहांत या डिजिटल चलनाचा वापर होण्याची शक्यता आहे. मात्र, या चलनावर कुठल्याही देशाचे नियंत्रण नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...