सोमवार, १३ जानेवारी, २०१४
केजरीवालांच्या जिवाला धोका – IB
भ्रष्टाचारमुक्तीसाठी खणखणीत आवाज देऊन लाचखोरांशी थेट पंगा घेणारे दिल्लीचे तडफदार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जिवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर खात्यानं दिला आहे. आपल्या 'झाडू'नं 'मिशन साफसफाई'ला वेगानं सुरुवात केल्यानं माफिया त्यांच्यावर खवळलेत आणि त्यांच्या जिवावर उठलेत. त्यामुळे आता त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षाकवच उभारावं लागणार आहे.
रविवार, १२ जानेवारी, २०१४
शनिवार, ११ जानेवारी, २०१४
भाजप 'आप'ला घेरण्याच्या तयारीत.
आम आदमी पार्टीने दिल्लीत काँगेसविरोधात भाजपच्या मतांवर डल्ला मारत सत्ता काबीज केली. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँगेसविरोधी मतांचे ' आप ' मुळे विभाजन होईल , अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे ' आप ' च्या विरोधात निवडणूक रणनिती आखण्याचे भाजपने ठरविले आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर पाटील खतगावकर ?
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून विदर्भ, मराठवाड्यातीलच चेहरा प्रदेशाध्यक्षपदी निवडला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या पदासाठी अनुत्सुक असल्याचे पक्षनेत्यांना कळविले असल्याचे कळते.
‘हरित महाराष्ट्र’ अभियान
' राज्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून ' हरित महाराष्ट्र ' अभियान राबविण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात वन विभागातर्फे सात कोटी रोपे लावण्यात येणार आहेत, ' अशी माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
'बाप'माणसाला 'आप'ची चपराक
राज ठाकरे यांनी उन्मेष जोशी यांच्याबरोबर भागीदारीत दादरची कोहिनूर मिल खरेदी केल्याने त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही , अशी टीका आम आदमी पार्टीचे समन्वयक मयंक गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
दाजीकाका गाडगीळ यांचे निधन
ज्येष्ठ सराफ व्यावसायिक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ (वय ९९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
दाजीकाका गाडगीळ यांचे निधन
ज्येष्ठ सराफ व्यावसायिक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ (वय ९९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
मालमत्ताधारकांवर सवलतींचा वर्षाव
नांदेड - मालमत्ताकराच्या नोटिसा मिळाल्यानंतर हवालदिल झालेल्या मालमत्ताधारकांना अखेर प्रशासनाने दिलासा दिला आहे.
तहसीलदार गर्तेत राहतो चिंता 'वॉट्सअप'वर वाहतो
नांदेड - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निव्वळ लोकानुनय करणाऱ्या शासकीय योजनांचा भडिमार आणि अंमलबजावणीचा कालावधी अत्यंत तोकडा शिवाय निकषही स्पष्ट नाहीत. या परिस्थितीत कायम कामाच्या गर्तेत असलेली तहसीलदार मंडळी, त्यांना भेडसावणारे प्रश्न, चिंता "वॉट्सअप'वर एकमेकांशी शेअर करताना दिसत आहेत.
दाऊद इब्राहिम लवकरच ताब्यात येईल - शिंदे
'कुख्यात "अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमला भारतात आण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तो आपल्या ताब्यात असेल,'' असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे केले.
मी सध्या मुंबईमध्येच; काही घडले तर सांगेनच
नांदेड - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठविल्यानंतर आपण मुंबईतच आहोत. दिल्लीसह कुठेही गेलेलो नाही. काही घडले तर सांगूच की, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 9) बोलताना व्यक्त केली.
बुधवार, ८ जानेवारी, २०१४
मंगळवार, ७ जानेवारी, २०१४
एसटीच्या वाहकाचा गोदावरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
नवीन नांदेड - आयुष्य संपवायचे या निर्धाराने शंभर फुटांपेक्षाही अधिक उंच असलेल्या गोदावरी नदीवरील वाजेगावच्या पुलावरून एकाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. विशेष म्हणजे हा दुसरा-तिसरा कोणी नसून, एस. टी. महामंडळाच्या बिलोली आगाराचा वाहक साईनाथ शंकरराव खंडेराय असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (ता. सहा) दुपारी ही घटना घडली.
बिलोली आगाराचे वाहक खंडेराय हे दुपारी दोनच्या सुमारास एसटीने प्रवास करत होते. वाजेगाव पुलावर वाहतुकीची कोंडी झाल्याने एसटी थांबली. अशा स्थितीत खंडेराय यांनी एसटीतून उतरून पुलावरून कठड्यावर चढून गोदावरीच्या पात्रात उडी मारली. हा प्रकार एसटीतील प्रवासी व चालकास लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली व काही नागरिक व जीवरक्षक मदतीसाठी धावले. अचानकपणे मरणाला जवळ करण्यासाठी गेलेले खंडेराय मात्र उडी मारूनही पाण्यातून वाचले, हे विशेष ! एवढ्या मोठ्या उंचीवरून उडी मारून नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले खरे; परंतु त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. खंडेराय हे बिलोली आगाराचे वाहक आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी त्यांची एसटी तपासली, या कारणावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळाला नाही. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बिलोली आगाराचे वाहक खंडेराय हे दुपारी दोनच्या सुमारास एसटीने प्रवास करत होते. वाजेगाव पुलावर वाहतुकीची कोंडी झाल्याने एसटी थांबली. अशा स्थितीत खंडेराय यांनी एसटीतून उतरून पुलावरून कठड्यावर चढून गोदावरीच्या पात्रात उडी मारली. हा प्रकार एसटीतील प्रवासी व चालकास लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली व काही नागरिक व जीवरक्षक मदतीसाठी धावले. अचानकपणे मरणाला जवळ करण्यासाठी गेलेले खंडेराय मात्र उडी मारूनही पाण्यातून वाचले, हे विशेष ! एवढ्या मोठ्या उंचीवरून उडी मारून नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले खरे; परंतु त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. खंडेराय हे बिलोली आगाराचे वाहक आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी त्यांची एसटी तपासली, या कारणावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळाला नाही. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
MIM, युतीपासून सावध राहा!
एमआयएम पक्षाची सभा म्हणजे 'निवडणूक गल्लीची आणि घोषणा दिल्लीची' असा प्रकार आहे.
सोमवार, ६ जानेवारी, २०१४
माळेगाव यात्रेत 90 कोटींची उलाढाल
माळेगाव यात्रेत आजवर जवळपास 80 ते 90 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. ही यात्रा अनेक वैशिष्ट्यांनी जशी नटली आहे, तशीच ती व्यापारी व ग्राहकांसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे.
रविवार, ५ जानेवारी, २०१४
Please Give Suggestion for AAM AADMI PARTY NANDED.
Please Give Suggestion for
AAM AADMI PARTY NANDED.
प्रिय मित्रांनो,
मी आनंद कल्याणकर,
२५-३० वर्षांपासून पत्रकारिता, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,विकासात्मक
कार्यात सहभागी आहे.
हे आपणास माहितीच आहे.
जातीयवादाचा आणि भ्रष्टाचाराचा धुमाकूळ पहाता या गोष्टींना संपविण्याची
विचार सरणी आणि सामान्य माणसांच्या विकासाची भूमिका घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे काम
करू इच्छितो.
आपण कमेंट मध्ये YES व प्रतिक्रिया द्यावी.
Mr.Anand Kalyankar.
https://www.facebook.com/anandrao.kalyankar
इन्फोसिसचे बालकृष्णन ‘आप’मध्ये
देशाचे माजी पंतप्रधान
लाल बहादुर
शास्त्री यांचे
नातू आदर्श
शास्त्री यांनी
आम आदमी
पार्टीत काम
करण्यासाठी 'अॅपल'ची एक कोटी
पगाराची नोकरी
सोडल्याची घटना ताजी असतानाच, 'इन्फोसिस'च्या संचालक
मंडळातून बाहेर
पडलेल्या व्ही.
बालकृष्णन यांनीही 'आप'मध्ये प्रवेश
केला आहे.
अधिकाऱ्यांवर फुटले ‘आदर्श’चे खापर; नेते सहीसलाम
राज्यात
राजकीय भूकंप
घडविणाऱ्या आदर्श सोसायटी घोटाळ्याबाबतचा चौकशी
अहवाल अखेर
आज सरकारने
अंशतः स्वीकारला.
आदर्श सोसायटीला
नियमबाह्य पद्धतीने परवानग्या देणाऱ्या बड्या
राजकीय असामींना
अभय देत
सरकारी अधिकाऱ्यांवर
माळेगाव यात्रेतील खंडोबारायाची शासकीय पूजा ?
पंढरपूरच्या विठोबाची शासकीय पूजा केली जाते त्या प्रमाणेच नांदेड मधील माळेगाव यात्रेतील खंडोबारायाची शासकीय पूजा करण्यात यावी, अशी मागणी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी माळेगाव यात्रेत आयोजित निर्धार परिषदेत केली.या परिषदेचे उदघाटन माजी आमदार भाई ज्ञानोबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.
गुरुगोविंद सिंघजी महाराज यांची मंगळवारी जयंती.
शीख पंथांचे १०वे गुरु श्री. गुरुगोविंद सिंघजी महाराज यांची येत्या मंगळवारी जयंती असून या निमित्त शासनाने सुट्टी जाहीर करावी अशी मागणी नांदेड-वाघाळा शहर महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री.किशोर यादव यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
शनिवार, ४ जानेवारी, २०१४
सरकारी यंत्रणाच स्वयंरोजगाराच्या मुळावर
जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार महिलांना
रोजगार उपलब्ध
करून देणाऱ्या
रेडिमेड गारमेंट
प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली
, मात्र सरकारी
यंत्रणेच्या असहकार्यामुळे हा प्रकल्प गेल्या
सहा वर्षांपासून
रखडला आहे.
समस्यांची तक्रार करायचीय, नंबर फिरवा
विविध
समस्यांनी ग्रासलेल्या नांदेडच्या जनतेला महापालिकेने
नवी वर्षाची
गिफ्ट दिली
असून, समस्या
सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असणारे
तक्रार निवारण
केंद्र सुरू
करण्याचा निर्णय
महापालिकेने घेतला आहे.
'आप'मुळे राजकीय स्पर्धा सुरू
भ्रष्टाचाराच्या
मुद्द्यावरून दिल्लीत आम आदमी पार्टीने
काँग्रेस आणि
भाजपला नामोहरम
केल्यानंतर आता यावरूनच एकमेकांवर राजकीय
कुरघोडी करण्यासाठी
सध्या भाजप
आणि काँग्रेसच्या
युवक संघटनांमध्ये
फेसबुक चालले आहे इतिहासात...
भारतात फेसबुकची लोकप्रियता हा चर्चेचा विषय राहिलेला नाही. फेसबुक हा जवळपास प्रत्येक इंटरनेट युजरच्या सोशल नेटवर्किंगचा अविभाज्य भाग बनला आहे. ब्रिटनमध्ये मात्र
‘गुगल’वरून होणार मतदारनोंदणी
सर्च
इंजिनमधील दादा कंपनी असलेल्या गुगल
कंपनीने आगामी
लोकसभा निवडणुकीसाठी
केंद्रीय निवडणूक
आयोगाला सहकार्याचा
हात दिला
असून, मतदारांची
ऑनलाइन नोंदणी
तसेच इतर
तांत्रिक बाबींसाठी
या कंपनीच्या
तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.
मंत्रिमंडळात आज ‘आदर्श’ निर्णय?
कुलाब्यातील
आदर्श टॉवर
घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल फेटाळण्याचा
यापूर्वीचा निर्णय काँग्रेस उपाध्यक्ष राहुल
गांधी यांच्या
आदेशावरून, गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागे घेतला जाणार
आहे. मात्र
आयोगाच्या अहवालावर
मराठी मुस्लिम साहित्यिकांकडे दुर्लक्ष
सासवड येथे शुक्रवारपासून ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील मुस्लिम मराठी साहित्यिकांना साधी निमंत्रणपत्रिकाही नाही अन् एकाही कार्यक्रमात सामावून घेतलेले नाही. या प्रकारावर नाराजी व्यक्त करीत मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळाने तीव्र निषेध केला आहे.
पाचशेची नवी नोट
रिझर्व्ह
बँक लवकरच
गांधी-२००५
मालिकेतली पाचशे रुपयांची नवी नोट
चलनात आणणार
आहे. या
नोटेवर
अनिल कपूर बनवणार ‘नायक २’
देशाच्या राजकारणात नवे नायक म्हणून पुढे आलेल्या 'आम आदमी पक्षा'चे अरविंद केजरीवाल यांची भुरळ 'फिल्मी' नायक अनिल कपूर यालाही पडली आहे. 'नायक' चित्रपटात एका दिवसाच्या 'क्रांतिकारी' मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणारा अनिल कपूर केजरीवालांच्या यशाला सलाम म्हणून नायकचा सिक्वेल बनविण्याच्या तयारीला लागला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)